पाऊस मला आवडतो... मग तो कसा का असेना... मला तो माझ्यापासुनच दूर घेऊन जातो... त्याच धो-धो कोसळण, सरीमागुन सरींनी देहावर वार करण, त्याच क्षणभरासाठी उन्हातल फिरकण प्रत्येक थेंबाच सुर्याच्या किरणांबरोबर चमकण... सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो..... त्याच हळुवार आगमन करण, चोर पाऊलांनी येऊन मनाच्या कुशीत शिरण, लहरीनुसार कधी संथ गतीन बरसण बरसताना हलक्या हवेबरोबर थोडस सरकण..... सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो..... त्याच सुकलेल्या मातीत एकरुप होण, खडकाळ जमीनीवरुन खळखळुण वाहण, अवनीचा देह क्षणात शांत करण तिच्या मनाला प्रेमाचा ओलावा देण..... सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो..... मन एकट असेल तर आठवांची मैफिल सजऊण देण, मैफिली असेल तर एकट करुन टाकण, आठवांना आठवताना कधी चेहऱ्यावर हसु उमटवण तर कधी नयनातील अश्रुंना आपल्या सोबत घेऊन जाण.... सगळच मला आवडत... खरच मला पाऊस आवडतो..... मला त्याच्या आठवणीत नेऊन सोडण, त्याला माझ्या जवळ घेऊन येण, हजरो मैलांच अंतर क्षणात दूर करण, दोघांची मन एकमेकांच्या प्रेमात भिजवण.. हे फक्त त्या पावसालाच जमत... म्हणुन मला पाऊस आवडतो..... खरच मला तो खुप खुप आवडतो......