ती एका छोटयाशा गावात रहात होती... ती वयाने खुप लहान होती.. जेमतेम ८
वर्षाची होती, तेव्हाची ही गोष्ट ..
त्या गावात एक महादेवाच(शंकराच) मंदिर होत..त्या मंदिरासमोर एक पांढऱ्या
फुलांच झाड होत..
त्या झाडाला अगदी लहान लहान नाजुक फुल यायची.. त्या फुलांना केशरी रंगाचा
तेवढाच नाजुक देठ होता.... तिला ती फुल खुप खुप आवडायची.
ती तिच्या मैत्रीणीं बरोबर त्या देवळासमोर खेळायला जायची.तिच्या मैत्रीनी
चाफ्याची फुल गोळा करण्यात मग्न असायच्या..पण ही वेडी मात्र त्या
पांढऱ्या फुलांना पाहण्यात गुंग होऊन जायची.त्या फुलांना एक वेगळाच वास
होता जो तिला स्वःतहाकडे खेचुन घ्यायचा...ती सारी फुल ओंजळीत घेण्याचा
प्रयत्न करायची पण तिच्या इवल्याश्या हातात ती मावयचीच नाहीत आणि तीने
फुलांना हात लावला की ती कोमेजुन जायची मग तीला वाटायच की ती फुल
तिच्यावर रुसली (अशी तिची भाबडी समजुत).तिने हात लावल्यामुळे त्या
फुलांचा पांढरा शुभ्र रंग फिकट होऊन जायचा.मग तीला कसतरीच व्हायच. तीला
नक्की काय व्हायच हे तीला कधी कळलच नाही. त्या फुलांचा गंध आठवत ती तशीच
झोपुन जायची.............
त्यानंतर काही दिवसांत ती मुंबईत राहायला आली..नवीन शहर, नवीन घर, नवीन
शाळा ह्या सगळ्या गोंधळात पांढऱ्या फुलांचा गंध हरवुन गेला. दोन वर्ष
अशीच निघुन गेली, पांढऱ्या फुलांचा गंध तिच्या मनातुन जवळ जवळ उडुन गेला
होता. तिच्या वडीलांनी आणखी एक नवीन घर घेतल अन जुन्या आठवणी ताज्या
झाल्या.... ती ज्या रस्त्याने शाळेत जायची त्या रस्त्यात ते लहानपणीच
पांढऱ्या फुलाच झाड तीला पुन्हा दिसल. तिच मन त्या झाडाकडे पुन्हा एकदा
खेचल गेल. दररोज सकाळी ७ वाजता शाळेत जाताना ओंजळभर फुल दप्तराच्या
कप्प्यात टाकुन न्यायची. ती शाळेत पोहचेपर्यंत ती कोमेजुन गेलेली
असायची.. मलुल होऊन जायची.... शाळेत शिकत असताना तिला कळल की त्या फुलांच
नाव प्राजक्त उर्फ पारीजातक असे होते... पण तीला त्याच्या नावशी काही
देण-घेण नव्हत.... तीच्यासाठी ते फक्त "पांढरी फुल" होती.... तीचे एक
स्वप्न होते की पांढऱ्या फुलांच झाड आपल्या अंगणात असावा... दररोज सकाळी
उठल्या उठल्या तीने त्या फुलांच सडा पाहत बसाव.... पण छे!!! तीला माहीत
होत हे स्वप्न पुर्ण होणार नाही... कारण त्याच्या मुंबईच्या घराला तेवढ
अंगनच नव्हत...
दिवस तसेच निघुन गेले.....ती मोठी झाली.. तीच लग्नही ठरल... एकदा ती
तिच्या होणाऱ्या नवऱ्याच घर पाहायला गेली. तीच स्वप्न तीच्या समोर उभ
होत... त्या घराच्या अंगणात प्राजक्ताच्या फुलांची झाड होती एक सोडुन
तीन-तीन झाड होती....तीला खुप खुप आनंद झाला.... त्या झाडाकडे पाहुन ती
खुदकन हसली.....लहान मुलीसारखी त्या झाडाजवळ धावत गेली... एकद लहान मुल
खेळता खेळता अचानक आईकडॆ पाहुन हसत तसच काहीस हसली ती... अन नंतर ते धावत
जाऊन आईला बिलगत.... असच काहीस झाल.... आता ती नवऱ्याच्या घरी जाण्यासठी
उत्सुक झाली होती... त्या दिवसाची ती आतुरतेने वाट पहात होती.... शेवटी
एकदाच तीच लग्न झाल.. मधुचंद्राची रात्र आली...ते पांढऱ्या फुलांनी
भरलेल आंगन तीच झाल... तीला खुप आंनद झाला होता.. सगळ काही तिच्या
मनासारख झाल होत... प्रेमळ सासर आणि जीव ओवाळुण टाकावा असा नवरा मिळाला
होता..त्या रात्री तिच्या(आज हक्कने तीच झालेल) अंगनात चंद्राचा कवडसा
पडला होत.. आकाशाताल दुधाळ चांदण तिच्या पायशी विराजीत झाल होत...
प्राजक्ताच्या फुलांचा सुंगध हवेत रेंगाळत होता... ती रात्र कधी संपली
तीला कळलच नाही.. पहाट झाली...
तीला हवी हवीशी वाटणारी सकाळ थोडयाच वेळेत येणार होती... ती अंथरुणातुन
हळुच बाहेर आली अन आंघोळ करुन अंगणात आली... तीच्या खांद्यावर ओले केस
रुळत होते... खटयाळ वारा हलकेच तीला स्पर्श करत होता..... चेहऱ्यावर
वेगळीच प्रसन्नता होती..पांढऱ्या फुलांचा तो गर्द सडा नववधुच्या स्वगतास
सज्ज होता... आज तीने एकाही फुलाला हात लावला नाही.. दुरुनच पाहात उभी
होती... ती सगळी फुल दाटीवाटीने बसली होती... सगळ्यांचा आकार सारखा , रंग
सारखा , रुपही सारखच... ती कितीतरी वेळ तशीच बसुन होती... प्राजक्ताच्या
गंधात मिसळुन गेली होती.. तीने एक फुल उचलुन हातात घेतल.. त्याला तळहावर
ठेऊन गंधात मिसळुन गेली होती.. तीने एक फुल उचलुन हातात घेतल.. त्याला
तळहावर ठेऊन त्याच्याकडे पाहात ती पुन्हा हरवली ह्या इवल्याश्या फुलात
काय जादु आहे हे तीला कळत नव्हत.... त्याच्या सुंगधासाठी ती एवढी बैचन का
होते हे तीला उमगत नव्हात...
एवढ सुंदर रुप आणि रंग असुनही कुणा रुपवतीच्या केसांत विराजमान होण्याच
भाग्य त्या फुलाच्या नशीबी नाही... कुठल्या देवतेच्या अर्चनेत ते सहभागी
नसत... कोणाच्याही घरी flower pot मध्ये ते उभ नसत... थोडक्यात
माणसारख्या स्वार्थी प्राण्याला ह्याचा काही उपयोग नाही, अस आहे का?
माणुस हा एकमेव प्राणी ओरबडण्यात सुख मानतो.. सुख 'देण्यात' असत
'घेण्यात' नसत हे त्याला कधी कळणार कोण जाणो.. सृष्टीची ही निर्मीती
नक्की कुणासाठी आहे, कशासाठी आहे? हे कोड सुटत नव्हत ...आपण कुणाच्याही
कामी येऊ शकत नाहे हे दुःख महाभयंकर असत .. हेच दुःख पारिजातच्या नशीबी
असुनही तो कसा काय बहरतो. फुलतो.. हे तीला कळत न्व्हात....तो
अल्पाआयुष्यी असला तरी अल्पसंतुष्ट नव्हता.. जगतो काही क्षणांसाठीच.. पण
त्या क्षणात आनंदाची उधळण करतो... स्वःता हसतो आणि दुसऱ्यालाही हसवतो..
आपल्या सुंगधाने सारा आसमंत दरवळुन टाकतो... माणसाने संसारात असाच जगायच
असत.. आपल्या जोडीदाराला आपला काही उपयोग होतोय का नाही हे पाहता....
अखंड प्रेमाचा वर्षाव करायचा.. आपल्या भक्तीने संसाराचा कानाकोपरा दरवळुन
टाकायचा .. संसार किती घटकेचा केला ह्यापेक्षा कसा केला ह्याला जास्त
महत्त्व द्यायच...
तीने ठरवुन टाकल आपणही असाच संसार करायचा....आपल अस्तित्व विसरुन
दुसऱ्याच जपायच....'देण्यात'ल सुख उपभोगायच....
हा विचार चालु असतानाच तीला नवऱ्याची आठवण झाली अन त्याला उठवण्यासाठी ती
घरात गेली... तीच 'पांढऱ्या फुला'शी असलेल नात आज तीला उमगल...

Comments