Skip to main content

Posts

Showing posts with the label You love someone coz..

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यात प्रेम करायचय मला ... दूर कुठेतरी समुद्रकिनारी हातात हात घालुन बसायचय मला, आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला, आयुष्यात प्रेम करायचय मला ... माझ्या मांडीत डोक ठेऊन तिला झोपी गेलेल पहायचय मला, तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला आयुष्यात प्रेम करायचय मला ... तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन तिला रागाने लालबुंद करायचय मला तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला आयुष्यात प्रेम करायचय मला ... आयुष्यातील तिचा हिमालय तिच्या बरोबरीने चढायचाय मला शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला आयुष्यात प्रेम करायचय मला ... ति माझ्यापासुन दुर जात असताना विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यावाटे मुक्त करायचय मला आयुष्यात प्रेम करायचय मला ... तिच्यसोबतचे माझे आयुष्य झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी तिचा चेहेरा पहात जायचय मला आयुष्यात प्रेम करायचय मला..!!!!!

प्रेम म्हणजे काय रे

प्रेम म्हणजे काय रे दुधावरची साय रे आपुलकीची ऊब मिळता सहज उतू जाय रे... प्रेम म्हणजे गात रहाणं आनंदाचं गोड गाणं प्रेम म्हणजे पोर्णिमेच्या चांदण्यामध्ये बेभान होणं... प्रेम म्हणजे झुळझुळ झरा प्रेम म्हणजे अवखळ वारा प्रेम म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या श्रावणधारा... प्रेम म्हणजे हळवं गीत प्रेम म्हणजे व्याकुळ प्रीत प्रेम म्हणजे कुर्बानीची जगावेगळी न्यारी रीत... प्रेम म्हणजे असून नसणं प्रेम म्हणजे नसून असणं प्रेम म्हणजे स्वतःपासून स्वतःलाच हरवून बसणं.... प्रेम म्हणजे काय रे दुधावरची साय रे आपुलकीची ऊब मिळता सहज उतू जाय रे....

राहीलयं काय आता

लाख वाटल लपवाव जगापासुन या मनाला तरीही आज तुझी कहाणी कळाली या जगाला सगळ्यांनी वाचल दुःखं या प्रत्येक शब्दांतुन काय लपवु राहीलयं काय आता लपवायला. लाख मन सागंत होत कुठेतरी थाबांयला वळण निघुन गेली नाही जमल वळायला सारेच धावले एकदम सुखाच्या मागे मी काय करु मला नाही जमल पळायला. आज काय झाल तुला उगाच असं रडायला कुठे चुकल्यासारखं नाही ना वाटत मनाला अशी कीती सुखं तुझ्या पदरात पडली जी कारणं होती तुझी तेव्हा मला सोडायला. आजही कुठे जमतय मला तस जगायला एक वणवा कमीच होती मला जळायला कालच्या पुरातून कसाबसा वाचलो मी पण डोळ्यातल्या पाण्यात नाही जमत पोहायला.

प्रेमात तर दोघेही आहोत,

प्रेमात तर दोघेही आहोत, पण इशारा कोण देणार..? बोलायचे तर दोघंानाही आहे, पण शब्द कोण देणार..? भेटायचे तर दोघंानाही आहे, पण वेळ कोण देणार..? प्रेम तर व्यक्त करायचय दोघंानाही, पण पहल कोण घेणार..? स्पर्श तर दोघंानाही हवा आहे, पण हींमत कोण देणार..? तोडायचेत पाश बंधनाचे, पण साथ कोण देणार..? सोबत तर हवी आहे जन्माची, पण हात कोण देणार..?

आहे माझी एक मैत्रिण खास

आहे माझी एक मैत्रिण खास असतो जिचा विचार सदैव माझ्या मनात रहात नसली जरी ती सारखी माझ्या आसपास तरी जपून ठेवितो तिच्या स्मृती मी सदैव माझ्या हृदयात आहे विलक्षण गोडवा तिच्या रुपात जाणवून येईल मृदुलता तुम्हाला तिच्या बोलण्यात अहंकाराचा लवलेश ही नसतो तिच्या वागण्यात नेहमीच जपत असते निस्वार्थता ती आमच्या नात्यात येउनी तिने माझ्या जीवनात मारली आहे चैतन्याची एक नवी फुंकर कोमेजुन गेलेल्या माझ्या या आयुष्यात त्यामुळे बहरून आला आहे एक अमृतमय मोहर गोड अशा माझ्या या मैत्रिणीबरोबर वागा नेहमी आत्मियतेने दुखवू नका कधी तिच्या मनाला कारण तिला दुखवल्याची जाणीवच करून देइल भविष्यात त्रास तुम्हाला वाटलेच जर कधी तुला आहेस एकटी तू या जीवनात एक साद दे फक्त मला कारण नेहमीच तत्पर असतील कर माझे सावरायला तुला

तू अशी तू तशी...

चमचमत्या किनारीची, तु कोरीव चांदणी, गोर्‍या चेहर्‍यावर तुझ्या नांदते हास्य नंदिनी तू अशी कोमल, फुलांची गंधराणी, तुला पाहता दरवळे, सुंगध मनोमनी.. तू अशी शीतल, आळवावरचे पाणी, तुला छेडीता अंग घेतेस चोरूनी .. तू अशी रंगाची रंगेल ओढणी, टिपक्यांच्या गर्दित, नक्षी लपेटूनी.. तु अशी मऊ, मखमल मृगनयनी, ठाव तुझ्या कस्तुरीचा घेता, फिरतो मी वेड्यावानी.. तु अशी ओली सरसर श्रावणी, चिंब देहावर नितळले मोत्याचे मणी.. तु अशी स्वप्नांची, ऐकमेव राणी, तुला आठवता गातो मी गाणी.. तु अशी तु तशी जिव गेला मोहरूनी, छेडता तुला अवचित गेलीस तू लाजूनी..

मी तुझाच आहे ग!!!!

फकत एकदा म्हण मी तुझाच आहे ग तु विसर मला कायमच....... पण- "मी तुला विसरलो" अस कधीही म्हणु नकोस... तु कधीच वाचु नकोस माझी कुठलीही कविता पण म्हण- मी वाचेन तुझी कविता कधीतरी... तु कधीच स्वीकारु नकोस माझ्या या खऱ्याखुऱ्या प्रेमाला पण.. "तुझं प्रेम खर आहे ग" तु कधीच देऊ नकोस मला फ़ुलांचा गुछ पण- एखादं गुलाबाचं फुल तरी ठेवुन जा रे या माझ्या हातावर..... तु कधी लक्षही देवु नकोस मला होणाऱ्या यातनांकडे... तु कधी रडुही नकोस माझ्यासाठी....... पण जाता जाता अंत्यदर्शनाला ठेवलेल्या त्या माझ्या प्रेताला एकदा , फक्त्त एकदा घट्ट कवटाळ आणि म्हण- या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात का होईना मी तुझाच आहे ग!!!! मी तुझाच आहे ग!!!!

असाव कुणीतरी......

असाव कुणीतरी...... आपल्या हाकेला 'ओ' देणार..... रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार.. असाव कुणीतरी...... आपल्या सोबत चालणार.. चांदण्यात फिरताना हातात हात घेणार.. असाव कुणीतरी...... कधी वाद घालणार.. खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार.. असाव कुणीतरी...... मनमोकळ बोलणार.. काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार.. असाव कुणीतरी...... खूप काही विचारणार.. लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार.. असाव कुणीतरी...................

स्वप्नं मिलनाचे ..

क्षणाचा हा आनंद.... मग विरहाचे दिस.... आसुसले नयन.... उसासले मन..... तुझाचसाठी... उजाड माळरान..... नाहि सावली हि कोठे मागे उभे दु:ख डोंगरा एवढे.... ये बनुनी मेघ... बरसुन जा माझ्यासाठी.... नाही कसलिच आशा.... मन झाले चिंधीचिंधी एक अंकुर बनुनि .. तु ये माझ्या जिवनी... सावल्या ही लांबल्या... रहिले रे घर दूर देवुन हातहाती होवुन रे सोबत.... मला घेवुन जा आज रात काळोखी.... चांदण्या नसे आकाशी बनुनि रे चांद .... हो तु रात पुनवेची मन मयुर हि नाचेना.... रित रित रे जीवन होवुने वसंत... फ़ुलव रे मनबाग जाईल रे शिशीर ..... येता तु धावत.... तुझ्या येण्याने रे ... मोहरेल हि काया स्वप्नं मिलनाचे .. आपुल्या होईल साकार जे विसावले.. तुझ्या-माझ्या पापण्यांत!

तूच माझे प्रेम...

प्रेम आहे तुझ्यावर कलतय ना तुला.... तरी का असा झुरवतोय तू मला... स्पर्श तुझा हवा आहे सांगू कसा तुला कसे प्रेमात तुझ्या वेडे आहे... कलवु तुला कसे.. बेभान होवून प्रतीत तुझ्या अखंड बुडून... तरु दे मला..... या कालजाच्या यातना तुला ही कलू दे... हवाय तुझा सहवास सोबत मला राहू दे... पूरे आता तुझा भास खरा खुरा समोर ये.. साठवून ठेवावा हा क्षण असा कही घडू दे. ताबा माझ्या मना वरचा संपूर्ण सुटू दे. डोळ्यांनी बोल नी.. डोळ्यांनी ऐकून घे... आज मी पूर्णपने तुझी... हे जरा पटवून दे...

तुझा आवाज तुझे शब्द

तुझा आवाज तुझे शब्द किती मोहक आहे खुप धावल्या वर कळल अरे .. हे मृगजळ आहे.... थकले धावुन मृगजळामागे भास आभासाच्या खेळात सत्य काही गवसेना तु माझा एवढच ठावुक होत मन तुझ्यातच गुंतल होत तु मात्र दूर उभा हसत शरीराने अन मनाने... वाट काट्यांची चालत होते धडपडत होते..... कितीदा झाली रक्तबंबाळ पाऊले मी मृगजळाला शोधत होते.... वाटलं समोर तुला बघुन...अरे... हेच ते ज्यासाठी केला एवढा अट्टाहास सगळ विसरले, तुझ्या बाहुंच्या झुल्यात अलगद झुलले आदळले खाड्कन , डोळे तेंव्हा उघडले समजावलं स्व:ताला आता नाही धावयचं कितीही प्रिय असलं तरी ते मृगजळचं निसटण्या-या वाळु सारख हातात न येणार.... तहाणलो असुनही पाणी नसणार....

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही..

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही… का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण… मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही… रात्री छान च असतात … तिच्या स्वप्नानी भरलेल्या देऊन जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला… प्रेम कधी सफल होते तर कधी नाही… ते जीवनात कधी ही सब कूच नसत पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असत… प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही … पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही…

When You Love Someone......

When you love someone so deep inside, It seems like it's so easy to hide. You've loved him for so very long, You would think he could do no wrong. Every day you would hope and pray, That he would always stay this way. He treated you like you should be treated, You thought your life was finally completed. You thought your love was growing true, And then one day it was all so blue. He started putting you down and it hurt, You thought all you were to him was dirt. He started ignoring you and you wondered why, All you wanted to do was curl up and die. You thought your relationship would never end, But that was all so fake and pretend. One night he was so sweet to you, You thought all those things were maybe untrue, Two days later he was back the same, You thought you were the one to blame. He thought the relationship was getting too serious And that you had become a little too curious. By this time you knew it wouldn't last, All the nice things he said were in the past. You t...

YoU loVE SoMeoNE cOz..............

If You Love Someone . . . If you love some one because you think that he or she is really gorgeous ... then it's not love.. it's - Infatuation . . . If you love some one because you think that you shouldn't leave him/her because others think that you shouldn't ... then it's not love.. it's - compromise . . . If you love some one because you think that you cannot live with out his/her touch .... then it's not love .. it's - lust . . . If you love some one because you have been kissed by him/her ... then it's not love.. it's - inferiority complex . . . If you love some one because you cannot leave him/her thinking that it would hurt his/her feelings .. then it's not love .. it's - charity . . . If you love some one because you share every thing with him/her ... then it's not love.. it's - friendship . . . but if you feel the pain of the other person more than him/her even when he/she is stable and you cry for him/her .. that's...