प्रेम म्हणजे काय रे
दुधावरची साय रे
आपुलकीची ऊब मिळता
सहज उतू जाय रे...
प्रेम म्हणजे गात रहाणं
आनंदाचं गोड गाणं
प्रेम म्हणजे पोर्णिमेच्या
चांदण्यामध्ये बेभान होणं...
प्रेम म्हणजे झुळझुळ झरा
प्रेम म्हणजे अवखळ वारा
प्रेम म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या श्रावणधारा...
प्रेम म्हणजे हळवं गीत
प्रेम म्हणजे व्याकुळ प्रीत
प्रेम म्हणजे कुर्बानीची
जगावेगळी न्यारी रीत...
प्रेम म्हणजे असून नसणं
प्रेम म्हणजे नसून असणं
प्रेम म्हणजे स्वतःपासून
स्वतःलाच हरवून बसणं....
प्रेम म्हणजे काय रे
दुधावरची साय रे
आपुलकीची ऊब मिळता
सहज उतू जाय रे....
दुधावरची साय रे
आपुलकीची ऊब मिळता
सहज उतू जाय रे...
प्रेम म्हणजे गात रहाणं
आनंदाचं गोड गाणं
प्रेम म्हणजे पोर्णिमेच्या
चांदण्यामध्ये बेभान होणं...
प्रेम म्हणजे झुळझुळ झरा
प्रेम म्हणजे अवखळ वारा
प्रेम म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या श्रावणधारा...
प्रेम म्हणजे हळवं गीत
प्रेम म्हणजे व्याकुळ प्रीत
प्रेम म्हणजे कुर्बानीची
जगावेगळी न्यारी रीत...
प्रेम म्हणजे असून नसणं
प्रेम म्हणजे नसून असणं
प्रेम म्हणजे स्वतःपासून
स्वतःलाच हरवून बसणं....
प्रेम म्हणजे काय रे
दुधावरची साय रे
आपुलकीची ऊब मिळता
सहज उतू जाय रे....
Comments