तुझा आवाज तुझे शब्द
किती मोहक आहे
खुप धावल्या वर कळल
अरे .. हे मृगजळ आहे....
थकले धावुन मृगजळामागे
भास आभासाच्या खेळात सत्य काही गवसेना
तु माझा एवढच ठावुक होत
मन तुझ्यातच गुंतल होत
तु मात्र दूर उभा हसत
शरीराने अन मनाने...
वाट काट्यांची चालत होते
धडपडत होते.....
कितीदा झाली रक्तबंबाळ पाऊले
मी मृगजळाला शोधत होते....
वाटलं समोर तुला बघुन...अरे...
हेच ते ज्यासाठी केला एवढा अट्टाहास
सगळ विसरले, तुझ्या बाहुंच्या झुल्यात अलगद झुलले
आदळले खाड्कन , डोळे तेंव्हा उघडले
समजावलं स्व:ताला आता नाही धावयचं
कितीही प्रिय असलं तरी ते मृगजळचं
निसटण्या-या वाळु सारख हातात न येणार....
तहाणलो असुनही पाणी नसणार....
किती मोहक आहे
खुप धावल्या वर कळल
अरे .. हे मृगजळ आहे....
थकले धावुन मृगजळामागे
भास आभासाच्या खेळात सत्य काही गवसेना
तु माझा एवढच ठावुक होत
मन तुझ्यातच गुंतल होत
तु मात्र दूर उभा हसत
शरीराने अन मनाने...
वाट काट्यांची चालत होते
धडपडत होते.....
कितीदा झाली रक्तबंबाळ पाऊले
मी मृगजळाला शोधत होते....
वाटलं समोर तुला बघुन...अरे...
हेच ते ज्यासाठी केला एवढा अट्टाहास
सगळ विसरले, तुझ्या बाहुंच्या झुल्यात अलगद झुलले
आदळले खाड्कन , डोळे तेंव्हा उघडले
समजावलं स्व:ताला आता नाही धावयचं
कितीही प्रिय असलं तरी ते मृगजळचं
निसटण्या-या वाळु सारख हातात न येणार....
तहाणलो असुनही पाणी नसणार....
Comments