Skip to main content

Posts

Showing posts with the label Lekh

sarika...

kadhi ti reading hall madhe diste..pustaka bajulach rahtat, aani tichya gappa kujbujat suru hotat...bolna band zala ki mag notebook ughdun librarian cha cartoon kadhat baste..te kuni pahila..ki mag ekach khaskhas pikte..sarva hall tikde mana valvun pahu lagto...tichya chehryavar khullela hasya..janu jag jinklyacha samadhan...! pariksheche diwas aale ki reading halls gachha bharun jatat..ti ekhadya corridor madhe pustak gheun firat rahte... haluvar pawla takat, eka hatane satat kesanna kurvalat nazar pustakat thevun abhyas karte..madhech kunitari yeta...'hi' bolta..ti fakta ek smile dete an punha vachu lagte.... chemistrychya lecturela ti bhan harpun professorcha bolna eikat rahte. ek haat kanavar..gambhir mudra..dole blackboardvar..aajubajuche chakit houn pahtat..hi aaj serious kashi..? sir achanak ticha naav pukartat..ti tashich...! tichi maitrin haluch tichya kanatla headphone kadhte aani ti bhanavar yete..sir punha naav pukartat an ti dhadpadat ubhi rahte... "91 marks.....

गोष्ट पांढऱ्या फुलाची..

ती एका छोटयाशा गावात रहात होती... ती वयाने खुप लहान होती.. जेमतेम ८ वर्षाची होती, तेव्हाची ही गोष्ट .. त्या गावात एक महादेवाच(शंकराच) मंदिर होत..त्या मंदिरासमोर एक पांढऱ्या फुलांच झाड होत.. त्या झाडाला अगदी लहान लहान नाजुक फुल यायची.. त्या फुलांना केशरी रंगाचा तेवढाच नाजुक देठ होता.... तिला ती फुल खुप खुप आवडायची. ती तिच्या मैत्रीणीं बरोबर त्या देवळासमोर खेळायला जायची.तिच्या मैत्रीनी चाफ्याची फुल गोळा करण्यात मग्न असायच्या..पण ही वेडी मात्र त्या पांढऱ्या फुलांना पाहण्यात गुंग होऊन जायची.त्या फुलांना एक वेगळाच वास होता जो तिला स्वःतहाकडे खेचुन घ्यायचा...ती सारी फुल ओंजळीत घेण्याचा प्रयत्न करायची पण तिच्या इवल्याश्या हातात ती मावयचीच नाहीत आणि तीने फुलांना हात लावला की ती कोमेजुन जायची मग तीला वाटायच की ती फुल तिच्यावर रुसली (अशी तिची भाबडी समजुत).तिने हात लावल्यामुळे त्या फुलांचा पांढरा शुभ्र रंग फिकट होऊन जायचा.मग तीला कसतरीच व्हायच. तीला नक्की काय व्हायच हे तीला कधी कळलच नाही. त्या फुलांचा गंध आठवत ती तशीच झोपुन जायची............. त्यानंतर काही दिवसांत ती मुंबईत राहायला आली..नवीन शहर,...

It's got to go

घराबाहेर पाऊल टाकलं नि एक बस समोरून निघून गेली. जरा अर्धं मिनिट आधी निघायला काय होतं असं मनात म्हणत मी परत घरात शिरले. बाहेर थंडीत १२ मिनिटं उभं राहण्यापेक्षा उबेत घरात थांबलेलं बरं. आत आलेच आहे तर म्हणून मग तीन जिने चढून मघाशी विसरलेली टोपी घेतली. ही नवी टोपी एकदम मस्त आहे. कान झाकणारी. शिवाय तीन वेण्या, दोन बाजूला दोन आणि शेंडीसारखी आणखी एक. मेड इन नेपाळ! पुन्हा बस जायला नको म्हणून मग लगेच बाहेर पडले. बसस्टॉपवर एक आजी आधीपासून उभ्या होत्या. त्यांना गुड मॉर्निंग घालून मी बसच्या वाटेकडे डोळे लावले. नकळत दोन्ही हातांनी कानावरून चाललेल्या टोपीच्या त्या दोन वेण्या ओढल्या आणि आजी बोलत्या झाल्या. "मस्त टोपी आहे ना!" "अं... हो. कान झाकते ना, त्यामुळे मला फार आवडली." मी तोंडभर हसून उत्तरले. या आधी कोणी बसस्टॉपवर असं गुड मॉर्निंग सोडून बोललं नव्हतं. इंग्रज लोकांशी, त्यातून ज्येष्ठांशी बोलायचं म्हणजे मला अजुनी जरा गडबडायला होतं. कुठे काय चुकेल अशी काळजी वाटत राहते. "दक्षिण अमेरिकेहून आणलीस का? इंकांच्याच असतात ना असल्या टोप्या?" "इंका!?" मला मी ऐकले ते बर...

प्रयोगातून पोळी - १

उण्यापुऱ्या पंचवीस वर्षांच्या आयुष्यात स्वयंपाक करण्याची माझ्यावर कधीच वेळ आली नव्हती. घरी असताना आईला थोडीफार मदत केली होती; अगदीच काही नाही तर स्वयंपाक करताना बघितले तरी होते. बंगलोरात चार वर्षे राहून तीही सवय मोडली. कामावरून आल्यावर आपापल्या खोलीत जाऊन गप्पा टप्पा, नि काकूंची हाक आल्यावर थेट जेवणाच्या टेबलावर. त्यामुळे केंब्रिजला जाऊन आपापला स्वयंपाक करायचा या कल्पनेने मी धास्तावले होते. त्यातून मला भात आवडत नाही. म्हणजे पोळी करायला कसेही करून शिकायलाच पाहिजे होते. जाण्याच्या दोन आठवडे आधी, चार दिवस रजा घेऊन मी स्वयंपाकावरचा 'क्रॅश कोर्स' करण्यासाठी साताऱ्याला गेले. भाजी हा प्रकार सोपा आहे, हे लगेच लक्षात आले. तेलात काही बाही जिन्नस घालून चिरलेल्या भाज्या घालायच्या. कुठलेसे मसाले घालायचे की झाले. पण पोळीचे काम कठीण दिसत होते. सुरुवात कणीक मळण्यापासून. मुळात आपल्याला चार पोळ्या करायला किती कणीक लागते हे कळणार कसे? मग त्या कणकेत किती पाणी घालायचे, ते कसे कळणार? ही मोजामोजी शिकण्यात एक दिवस गेला. मग पुढची पायरी म्हणजे ती भिजवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी, उत्साहाने कणीक भिजवायला घेतल...

प्रयोगातून पोळी - २

संध्याकाळी, नवे पीठ, नवा उत्साह, नवी आशा अशा नवोन्मेषशालिनी अवस्थेत पुन्हा पोळीप्रयोगांना सुरुवात केली. सुरुवातीलाच घोडे अडले. माझ्या हिशोबाने पुरेसे पाणी घालून झाले तरी पीठ काही नीट भिजेना. थोडे थोडे भिजलेले गट काही केल्या एकत्र येत नव्हते. चार गोळे दामटून एकत्र केल्यावर पाचवा त्यात दामटायला जावे तर एक नवीन गोळा 'आमचा फक्त बाहेरून पाठिंबा' असे म्हणून बाहेर पडत होता. शेवटी चमचा चमचा पाणी वाढवून एक दणकट 'मोडेन पण वाकणार नाही' असा गोळा तयार झाला. तवा केव्हाचा तापून तयार होता. 'कडक' कणकेतला एक छोटा गोळा घेऊन लाटायला सुरुवात केली. 'न दाबादाबीचा' दुसरा नियम पाळणे शक्यच नाही हे लगेच लक्षात आले. शिवाय लाटता लाटता पोळीच्या कडेला आपोआप कातरल्यासारखी नक्षी होते आहे असेही लक्षात आले. तरी तेल चोपडून घडी घातली की सगळे मार्गावर येईल अशी आशा वाटत होती. भरपूर तेल लावून घडी घातली. आता लाटणे थोडे सोपे झाले, तरी नव्या कडाही कातरू लागल्या. मी पिठी म्हणूनही तेच चपाती फ़्लॉर वापरत होते. तर त्यातल्या कोंड्यामुळे पोळीच्या मध्यात खळगे तयार होऊ लागले. जमेल तितके लाटून पोळी तव्यावर...

नट्सफ़र्ड

२००३ सालच्या सप्टेंबर महिन्यात तनुला भेटायला मी नट्सफ़र्डला गेले होते. तनु माझी इंग्लंडमधली पहिली मैत्रिण. मी पोचल्याच्या दुसर्‍या आठवड्यात ती केंब्रिजला आली होती. माझ्या घराची, बँकेची वगैरे घडी बसवून मला तिच्या घरी नट्सफ़र्डला येण्याचं आग्रहाचं आमंत्रणही देऊन गेली होती. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी जाण्याचे बेत आखायला सुरुवात केली. नट्सफ़र्ड मँचेस्टरजवळचे एक छोटे खेडे आहे. समुद्राकाठी राजशिळेवर बसून लाटेला थांबण्याची आज्ञा करणार्‍या कनूट राजावरून याचे नाव पडले आहे. केंब्रिजहून नट्सफ़र्डला जायला थेट आगगाडीची सोय नाही. त्यामुळे तीन ठिकाणी गाडी बदलून जावे लागणार होते. मला इंग्लंडमधे पोचून एक महिनाही पुरा झाला नव्हता. इंग्रजी लोकांचे उच्चार काही केल्या कळत नसत आणि मी काय सांगते, विचारते आहे ते त्यांना कळतेय की नाही हेही कळत नसे. त्यामुळे तनुला माझी तशी काळजीच वाटत होती. मी मात्र 'त्यात काय; जमेल!' अशी निवांत होते. शुक्रवारी संध्याकाळी साधारण साडेचार पाचला केंब्रिजहून निघायचे, रात्री नऊपर्यंत नट्सफ़र्डला पोचायचे, शनिवार-रविवार तिथे हिंडून रविवारी रात्री घरी परत असा एकंदरित बेत होता. जातान...

इथली तिथली माणसं

आज दुपारी बाजारात गेले होते. बाथ गावात शनिवारचा बाजार असतो. तिथे आजुबाजूच्या खेड्यात पिकलेली भाजी, फळे झालंच तर सरबते, लोणची, मुरंबे, खारवलेले मांसाचे प्रकार मिळतात. उघड्यावर मंडई असते तसा प्रकार. तशी एक बंद मडईदेखील आहे. तीही मी आधी बघितली नव्हती. त्या इमारतीची नक्षीदार दारं आमच्या ऑफिसातून दिसतात त्यामुळे तिथे जायची उत्सुकता होती. शिवाय आज हवा मस्त होती. पंचविसापर्यंत तापमान, हलके हलके ढग त्यामुळे उन्हाचा तडाखा नाही आणि मंद वार्‍याच्या झुळका. अगदी आल्हाददायक. कधी नव्हे ते गरम जाकीट, कानटोपी वगैरे न घालता बाहेर पडण्याची संधी. बाहेर पडल्यावर, चालतच जावं की काय असा विचार मनात आला की लगेच बस आली. बसमधे भरपूर टूरिस्ट कपड्यातले लोक. छोटे मोठे कॅमेरे घेतलेले, पाण्याच्या बाटल्या घेतलेले, उन्हाळी कपड्यातले, आनंदी लोक. मीही त्यांच्यातलीच एक होऊन गेले. गावात पोचल्यावर गर्दीबरोबर मी मुख्य चौकात पोचले. बाथमध्ये जी गरम पाण्याची कुडं आहेत, त्याभोवती बरंच जुन्याकाळातलं बांधकाम आहे. अगदी आपल्याकडच्या काळ्या दगडातल्या देवळांसारखं. मला तिथे आत कायम महाबळेश्वरचं कृष्णेच्या उगमाजवळचं देऊळ आठवतं. त्या कुं...

भारतीय मतदार

आपल्याकडे ग्रामपंचायती पासून लोकसभे पर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या कि शब्दांचे खेळ सुरु होतात. मतदाराचा लगेच मतदार राजा होतो. जगभरात थोड्याफार फरकाने सगळीकडे हिच परिस्थिती असावी असे वाटते. (वेगळी असू शकते.) पण आपल्याकडे जरा खासियत असते. भारतीय मतदार जरा हटकेच आहेत हे मात्र खरे. भारतात निवडणुक कशासाठी होते आणि कोणासाठी होते हा एक मोठा अभ्यासाचा प्रश्नच आहे. मतदान कोणत्या कारणासाठी होते कोण करते हे सगळेच एकदम अभ्यासाचे मुद्दे आहेत. निवडणुका ग्रामपंचायतीच्या असतात, साखर कारखान्यांच्या, दुधसंघांच्या…….. विधानसभेच्या आणि लोकसभेच्या. निवडणुका होतात पण वर्षानुवर्ष त्याच त्याच मुद्यांवर होतात. मतदारांची मानसिकता फारशी बदलेली नाही. खरतर मतदान हा शब्दच कसा आहे ना? मत आपलं असत. ते आपण देणार असतो. खास करून अशा माणसाला जो समाजासाठी काही ना काही कार्य करणार असतो. आपण स्वतः सुद्धा समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत. त्यामुळे मतदान हा आपला स्वार्थ आहे. आपण मत देतो ते एका मोबदल्यासाठी. मग ते दान कसे? आपल्याकडे १३ दिवसात सरकार पडले, परत निवडणुका झाल्या. पण सरकार पडायचे कारण काय? कांद्याचा भाव. ठिक आहे. मान्य...

जन पळभर

जन पळ भर म्हणतील हाय हाय! मी जाता राहील कार्य काय? किती सरळ, सोपी परंतु मनाला भिडणारी आणि आयुष्याचे सत्य सांगणारी ही कविता आहे ना? शाळेत जेव्हा शिकलो तेव्हा तर धड कळली सुद्धा नव्हती. फक्त कवितेच्या चालीमुळे लक्षात राहिली होती. पण म्हणतात ना एखादी गोष्ट मनात घर करून राहते. थोडी फार तशीच ही कविता मनातच घर करून राहिली आहे. मला नेहमीच हा प्रश्न पडत आला आहे की जेव्हा आयुष्य म्हणजे काय? हे सुद्धा माहीत झालेलं नसतं तेव्हा या असल्या कविता शिकवल्याच का? शाळेत मराठीचा अभ्यास न आवडण्याचे हे तर एक कारण नसेल? असो, सांगायचा मुद्दा हा की मृत्यूची आणि माझी ओळख या कवितेने झाली म्हणायला काही हरकत नाही. एखादी गोष्ट उदाहरणा शिवाय समजणे कठिणच तसे, मग आता मृत्यू म्हणजे काय हे कसे समजणार? अन याच उत्तर लहानपणी लहान मुलाला कोण देणार? पण यामुळे प्रश्न मनात तसाच राहून गेला. जेव्हा होते ते आजोबा वारले तेव्हा काही जास्त जाणवलं नाही अन वय पण तसं लहानच होत. पण झालेला सगळा प्रकार पाहून चक्रावायला झालं होतं. कधी न पाहिलेली माणसं पाहिली होती. त्यामुळे गूढ जास्तच वाढलं होतं. या सुमारास मी मावशीकडे जायचे शिकवणीला. मावसं ...

अनय

अनय, हे नाव काहिंना माहित असेल तर काहिंना अजिबातच माहित नसेल. मला सुद्धा फार काही माहित नाही. मला एवढच माहित आहे कि अनय हा राधेचा पती. आता राधा कोण? असे मात्र फार कमी लोक विचारतील. पण राधा अनय बद्दल बोलतानाच “राधा कोण?” या प्रश्नाचे जे उत्तर मिळते तेच अनेक प्रश्न पुन्हा उभे करून जाते. तर, परत तो प्रश्न आलाच. राधा कोण? राधा हि कृष्णाची राधा. आता जिथे आपण अनयला राधाचा पती म्हणतो तिथेच राधा कृष्णाची म्हणतो? याला काय म्हणावे? प्रेमाची नाती? नात्यांची चेष्टा की प्रेमाची चेष्टा? नक्कि काय? अनयचं नाव आलं की माझ्या मनात हे असे प्रश्न येतात आणि ते नेहमीच अनुत्तरीत राहतात. आजुबाजूला पाहिलं तर मला अनेक अनय दिसतात. एक काळ होता जेंव्हा प्रेमविवाह म्हणजे एक धाडस असायचं. आता आजच्या जगात प्रत्येकजण प्रेम करतो. कदाचित काहिजण अव्यक्त, काहि जण यशस्वी आणि काहिजण अयशस्वी तर काहि जण लग्ना नंतर आपल्या पती/पत्नीवर. जे पती पत्नी एकमेकांवर लग्नानंतर प्रेम करतात, प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ देतात ते खरच नशीबंवान. पण जे अनय आहेत त्यांच काय? आता त्यांच्या पत्नीच पहिल प्रेम त्यांच्यावर नसेल तर त्यांचा काय दोष? ...

युती तुटायला हवी का? - माझे मत

मराठी संकेतस्थळ उपक्रम येथे झालेल्या “शिवसेना - भाजपा युती तुटायला हवी का?” या चर्चेत लिहिलेला हा प्रतिसाद: युतीचे राजकारण हे नेहमीच गरजेसाठी होते. मग ते कोणत्याही पक्षांचे असुदेत. शिवसेना - भाजपा युती हि कदाचित अशी एक युती आहे कि ती अनेकदा तुटता तुटता राहिली आहे. महाराष्ट्रातले महत्वाचे ४ राजकिय पक्ष जे म्हणवून घेतात त्यातल्या दोन (शिवसेना आणि राष्ट्रवादी) पक्षांना देशव्यापी पाठिंबा नाही. हे खरतर प्रादेशिक पक्षच म्हणायला हवेत. या दोन्ही पक्षांना सत्तेची चटक जास्त आहे. इतरांना नाही असे नाही. पण हे दोन पक्ष स्वबळावर राष्ट्रीय पातळीवर यश मिळवू शकत नाही. पण स्वतःच्या प्रादेशिक ताकतीने इतर २ राष्ट्रीय पक्षांना जेरीस आणू शकतात आणि तेच ते करत आहेत. आम्हा सामान्य मराठी लोकांना याचे आता काहीच वाटत नाही. सांगकाम्या व्यक्ती जर राष्ट्रपती झाली तर ती मराठी असल्याची लाज मात्र नक्कि वाटेल. अलिकडचे राजकिय पडसाद पाहिले तर काहीसे असे वाटते, १. भाजपा: चाचपडणारा राष्ट्रीय पक्ष २. काँग्रेसः आत्ता सत्ता आहे तो पर्यंत सोनियाचे दिवस जगा. उद्या कोणी पाहिलाय? मग सत्तेसाठी वाट्टेल ते करावी लागले तरी चालेल. ३. श...

काही नाही ठीक

लेखाचे शीर्षक वाचून काहीच उलगडा नाही ना झाला? महाविद्यालयात असताना कोणती गाडी घेणार अस म्हटलं की आमचं एक उत्तर असायचं - काही नाही ठीक. अरे हे काही नाही ठीक म्हणजे काय? मग आम्ही सांगायचो, काही नाही ठीक म्हणजे कायनेटिक. :) भारतीय वाहन बाजारावर एके काळी अधिराज्य गाजवणारा हा उद्योग समूह आणि त्यांची एक गाडी जी फक्त कंपनीच्या नावानेच आजवर ओळखली गेली/जाते, त्या गाडीची थोडी माहिती वाचण्या पूर्वी, या कंपनी बद्दल थोडे फार … Luna TFR Luna Super भारतीय वाहन उद्योगात फिरोदिया कुटुंबीयांचे एक वेगळे स्थान आहे. आजची फोर्स मोटर्स (अभय फिरोदिया) आणि कायनेटिक मोटर कंपनी (अरुण फिरोदिया) या दोन फिरोदिया कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. दुचाकी वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या उद्देशाने एच. के. फिरोदियांनी कायनेटिक वाहन उद्योगाची स्थापना केली. सर्व प्रथम १९७२ ला कायनेटिक लुनाचे उत्पादन सुरू झाले आणि मोपेड या वाहन क्षेत्रात कायनेटिकने आपले पाय घट्ट रोवले. Kinetic Honda DX and ZX मग लुनाचे अनेक प्रकार झाले. लुना टिएफआर (एकाच व्यक्तीकरिता), लुना डबल प्लस, मॅग्नम, सुपर असेच आणि काही प्रकार झाले. खरंतर लु...