१४ फ़ेब्रुवारीला व्हॅलेंटाईन जो सुरु झालाय तो संपायचं नाव़च घेत नाहीये. जिकडे बघावं तिकडे ’प्रेमं’ दिसताहेत. कुठे नुकतीच सुरवात आहे. कुठे बर्याच विरहानंतरच्या गाठी आहेत. कुठे वाट बघणं चालू आहे तर कुठे अंदाज घेणं. Love is indeed in the air.
या सगळ्यात अभाव जाणवतोय तो प्रथमदर्शनी प्रेमाचा. आमचंच दुर्देव. स्वत:च्या बाबतीत सोडाच पण इतरही कुठे ’पाहताच ती बाला’ असं ऎकायला मिळत नाही. असंख्य पर्यायांची उपलब्धता हे असेल का कारण? तसं तर नुसतं ’प्रेम’ तरी कुठे पुस्तकातल्यासारखं दिसलंय? सगळं अगदी आलबेल असेल, आवडीनिवडी जुळत असतील, परिस्थिती समान असेल तर सोयिस्कररित्या एकत्र राहणं , फ़िरणं म्हणजे प्रेम का? डोक्याला कसलाही त्रास नको. अजिबात. प्रेमासाठी थांबणारा ठरतो अव्यवहारी भावनिक मूर्ख.
छे! प्रेम ही संकल्पनाच फ़ार क्लिष्ट आहे. म्हणजे एकीकडून देवदास प्रॅक्टिकल नव्हता म्हणून बोंबलायचं आणि दुसरीकडून The Great Gatsby चा शेवट वाचून हळहळायचं.
विशुद्ध,उदात्त,सोयिस्कर,एकतर्फ़ी. किती प्रकार प्रेमाचे. नक्की कुठला ’चांगला’? कुठला ’खरा’? कुठे फ़सवणूक आहे? कुठे सोय? अर्थात हे प्रश्नही आम्हालाच पडतात. इतरांचं आनंदात चाललंय. पोरगी पटायला हवी, मुलाला गटवायला हवा, ही बरी आहे, हा हुशार आहे ( म्हणजे future prospectus चांगलं आहे), च्यायला आता गर्लफ़्रेन्ड पायजेच वगॆरे वगॆरे. ’प्रेम’ पाहिजे असं म्हणणारे कमी का झालेत? मागून मिळत नाही म्हणून अपेक्षा ठेवायची नाही हा शहाणपणा एवढ्या लवकर आमच्या पिढीत निपजला कसा? कदाचित आधीच्याच पिढीत प्रेमाचा आणि प्रेमाच्या आग्रहाचा अभाव होता म्हणून असेल. किंवा प्रेमाचं प्रदर्शन त्यांनी कधी केलं नाही म्हणून ते आमच्यापर्यंत पोचलंच नसेल.
परमेश्वराने मुक्तहस्ते उधळलेल्या असंख्य भावभावनांतल्या सर्वोत्तम भावनेचा स्पर्श होवून आयुष्य उजळून निघावं हीच म्या अव्यावहारिकाची त्या जगन्नियंत्याचरणी प्रार्थना.
॥ सुखिया झाला ॥

Comments