मेसमधला कडबा संपवून रूमवर परतत होतो
पाउस आणि मेस दोहोंच्या नावाने खडे फ़ोडत होतो
उसवलेलं जर्किन तुटलेली चप्पल
फ़क्त पॆशाचीच जमत नाही नक्कल
पाउस वाढला तसा गेलो एका बंद दुकानाच्या आश्रयालावर
पाटी लटकत होतीच'फ़क्त ९९ रू. महिन्याला'
इतक्यात शेजारी येउन उभा राहिला एक भिकारी
फ़ाटके कपडे, राठ केस,अंगाला वास
माझ्याच नशिबी असतो असला त्रास
कपाळावरच्या आठ्या बघून तो हसला
म्हणला 'सांग तर खरं, तुला त्रासंय कसला? '
'माझ्याकडे गाडी नाही , बसमध्ये फ़ार गर्दी असते
मेसच्या जेवणानेच तब्येत सारखी बिघडते
शोरूम मधून घेतलेली माझीच चप्पल तुटते
गरजेच्या वेळीच मोबाईलची बॅटरी दगा देते
अभ्यास केला तर मार्क पडत नाहीत
कविता केल्या तर यमकं जुळत नाहीत
'खासा' कधी होणार नाही , नेहमीच रहाणार 'आम'
आजकाल कशातच वाटत नाही राम '
ऎकता ऎकता भिकारी विचारात पडला
शंभरच्या बल्बसारखा त्याचा चेहरा उजळला
'फ़ारच खडतर रे आयुष्य तुझं , त्यामानाने मी बरा
भिकारी असण्यातच असतो आनंद खरा
गाडीचं जाउदे रे, मी तर बसही करत नाही
तिकीटापुरता सुध्दा माझ्याकडे पॆसा उरत नाही
जेवणाचं म्हणशील तर रोज नविन व्हरायटी
दहा घरची एकाच दिवशी सारखी नसतात खरकटी
चप्पल तुटली तरी कधी अडत नाही माझं घोडं
तुटण्यासारखं त्या चपलेत राहिलेलं असतं थोडं
आई गेली तशी शाळा तिसरीतच सुटली
म्हणलं बरं झालं , पुढे शिकण्याची कटकट वाचली
कविता करण्याच्या मी कधी फ़ंदात पडत नाही
कुणी कविच म्हणून गेलाय
उपाशीपोटी कविता जमत नाही
रात्री प्रार्थना करत झोपतो सकाळचा सूर्य दिसण्याची
त्याला बघताच खात्री पटते स्वत:च्या असण्याची
दारूड्यांच्या बेफ़ाम गाड्या आणि पुराचं पाणी
रात्र निभावली गेली तर देवाचीच करणी
आयडेंटिटी क्रायसिस चा मला कसला त्रास?
गटारातल्या मुडद्याच्या दिशेने आयुष्याचा घडतोय प्रवास '
ईतकं बोलून भिकारी खिन्नपणे हसला
अमावस्येचा चंद्र त्याच्या डोळ्यांत दिसला
बाहेर पडला तो चालू लागला पावसात
पाउस कोसळत होता , वेड्यासारखा हसत होता
दोघांमधला भिकारी कोण हा प्रश्न पुसत होता

Comments