त्या ढळत्या रात्री, चंद्र हासला मजला,
हा वेडा झाला, वेडा झाला, वदला....
किती प्रसन्न वदनें, मधुर भाषणें,
मोहुनी सखिने मजला,
संकेत भेटीचा दिला प्रियेने,
कार्तिक पुनवेला..
मी प्राजक्ताचा मृदू गालिचा,
तिजसाठी अंथरला,
परि ना आली ती....
परि ना आली ती निष्ठुर बाला,
वचन देउनही मजला....
रुसलो मी, रागेजलो,
फुले ती उधळित मग बसलो..
अन्, चंद्राच्या कुत्सित हसण्याला,
निमित्त की झालो....
हसण्याने मुखचंद्र तयाचा लाल की हो झाला,
सूर्यास पाहुनी प्राचीवरती, मावळून गेला....
हा वेडा झाला, वेडा झाला, वदला....
किती प्रसन्न वदनें, मधुर भाषणें,
मोहुनी सखिने मजला,
संकेत भेटीचा दिला प्रियेने,
कार्तिक पुनवेला..
मी प्राजक्ताचा मृदू गालिचा,
तिजसाठी अंथरला,
परि ना आली ती....
परि ना आली ती निष्ठुर बाला,
वचन देउनही मजला....
रुसलो मी, रागेजलो,
फुले ती उधळित मग बसलो..
अन्, चंद्राच्या कुत्सित हसण्याला,
निमित्त की झालो....
हसण्याने मुखचंद्र तयाचा लाल की हो झाला,
सूर्यास पाहुनी प्राचीवरती, मावळून गेला....
Comments