आजकाल शब्दांचीच भिती वाटू लागली आहे.
शब्द, पूर्वी किती सहज सुचायचे
हातात हात घालून मला भेटायचे
माझ्याचसारखे उथळ,निरूपद्रवी, सरळसाधे.
यमक , अनुप्रासाची बंधनं नसणारे.
पुन:पुन्हा भेटले तरी आपलेसे वाटणारे
अनोळखी शब्दांशी माझं फ़ारसं कधी जुळलंच नाही
कधीतरी भेटणार्यांचं कॊतुक कधी वाटलं नाही
आवडते, जिवलग शब्द मात्र आजकाल दगा देतात.
नको असतं तेव्हा भरभरून भेटतात
गरज पडते तेव्हा एकटं टाकून निघून जातात
मी वाट बघत राहतो किनार्यावर
भरती येत नाही
सहज वर जाते नजर
आकाशात माझा चंद्रच नाही.
कसा येणार मग प्रतिभेला बहर?
भूगोलाचे नियम इथेही लागू होतात तर!
पण नक्की काय झालं? का रूसले शब्द?
की गाजवायचा होता मलाच त्यांच्यावर हक्क?
शब्दांचा तळ खरवडता खरवडता....
अं! अं! कसं पकडलं! शब्द ओळखीचे वाटताहेत रे!
आहेत खरे! पण शब्दांवर कसली मालकी?
मालकी नाही? मग इतक्या वर्षात आजच सुचले हे शब्द!
हा प्रतिभेचा बहर की सरस्वतीचा प्रसाद ?
की आहेत शब्द दुसर्याच कुणाचे?
मला नको विचारू, उत्तर देणार नाही.
माझी कविता अशीच आहे,
प्रश्न सापडतील पण उत्तर मिळणार नाही.
प्रश्न? किती गहन आहे हा प्रश्न? काय व्याप्ती काय त्याची?
किती अनोळखी शब्द आहेत त्यात?
शब्दांचं जाउदे रे , आधी प्रश्न तर कळू दे
असं कसं? कवितेचा विषय तर शब्द आहे.
निदान पहिल्या ओळीचा तरी हाच अर्थ आहे.
आणि जरा यमक जुळव, शब्दांवर घाल निर्बंध
नाहीतर लिही तरी कवितेच्या खाली , 'मुक्तछंद'
कविता लिहिण्याचा प्रयत्न कधीच फ़सला आहे
आकाशातला बाप माझ्यावर कायमचाच रूसला आहे
बघ हे असं होतं
बघ हे असं होतं
यमक जुळवायला जातो आणि कवितेचं हसं होतं
नाही जुळत यमकं , जमली तरी अर्थ लागत नाही
सगळ्यांनाच सगळं जमतं असं नाही
बस तर मग घेउन जुन्याच शब्दांना
कधी तोकडे पडले तेच शब्द तर म्हणू नकोस
'खरं महत्त्व असतं भावनांना'
अरे पण इतरांसारखे तेच तेच शब्द पुन:पुन्हा..
अंहं! 'पुन:पुन्हा' म्हणू नकोस. कवितेत आधी वापरलाय
'परत परत' तर बेचव झालाय.शोध, शोध. नविन शब्द शोध.
शोध आणि प्रतिक्षा, हेच आहे तुझं आयुष्य.
शाप देतो आहेस की भविष्य सांगतो आहेस?
तुला काय वाटतं?
मला काहीच फ़रक पडत नाही.
दोन्हीचा शेवट एकच आहे त्यामुळे
तक्रारही नाही आणि भितीही नाही......
शब्द, पूर्वी किती सहज सुचायचे
हातात हात घालून मला भेटायचे
माझ्याचसारखे उथळ,निरूपद्रवी, सरळसाधे.
यमक , अनुप्रासाची बंधनं नसणारे.
पुन:पुन्हा भेटले तरी आपलेसे वाटणारे
अनोळखी शब्दांशी माझं फ़ारसं कधी जुळलंच नाही
कधीतरी भेटणार्यांचं कॊतुक कधी वाटलं नाही
आवडते, जिवलग शब्द मात्र आजकाल दगा देतात.
नको असतं तेव्हा भरभरून भेटतात
गरज पडते तेव्हा एकटं टाकून निघून जातात
मी वाट बघत राहतो किनार्यावर
भरती येत नाही
सहज वर जाते नजर
आकाशात माझा चंद्रच नाही.
कसा येणार मग प्रतिभेला बहर?
भूगोलाचे नियम इथेही लागू होतात तर!
पण नक्की काय झालं? का रूसले शब्द?
की गाजवायचा होता मलाच त्यांच्यावर हक्क?
शब्दांचा तळ खरवडता खरवडता....
अं! अं! कसं पकडलं! शब्द ओळखीचे वाटताहेत रे!
आहेत खरे! पण शब्दांवर कसली मालकी?
मालकी नाही? मग इतक्या वर्षात आजच सुचले हे शब्द!
हा प्रतिभेचा बहर की सरस्वतीचा प्रसाद ?
की आहेत शब्द दुसर्याच कुणाचे?
मला नको विचारू, उत्तर देणार नाही.
माझी कविता अशीच आहे,
प्रश्न सापडतील पण उत्तर मिळणार नाही.
प्रश्न? किती गहन आहे हा प्रश्न? काय व्याप्ती काय त्याची?
किती अनोळखी शब्द आहेत त्यात?
शब्दांचं जाउदे रे , आधी प्रश्न तर कळू दे
असं कसं? कवितेचा विषय तर शब्द आहे.
निदान पहिल्या ओळीचा तरी हाच अर्थ आहे.
आणि जरा यमक जुळव, शब्दांवर घाल निर्बंध
नाहीतर लिही तरी कवितेच्या खाली , 'मुक्तछंद'
कविता लिहिण्याचा प्रयत्न कधीच फ़सला आहे
आकाशातला बाप माझ्यावर कायमचाच रूसला आहे
बघ हे असं होतं
बघ हे असं होतं
यमक जुळवायला जातो आणि कवितेचं हसं होतं
नाही जुळत यमकं , जमली तरी अर्थ लागत नाही
सगळ्यांनाच सगळं जमतं असं नाही
बस तर मग घेउन जुन्याच शब्दांना
कधी तोकडे पडले तेच शब्द तर म्हणू नकोस
'खरं महत्त्व असतं भावनांना'
अरे पण इतरांसारखे तेच तेच शब्द पुन:पुन्हा..
अंहं! 'पुन:पुन्हा' म्हणू नकोस. कवितेत आधी वापरलाय
'परत परत' तर बेचव झालाय.शोध, शोध. नविन शब्द शोध.
शोध आणि प्रतिक्षा, हेच आहे तुझं आयुष्य.
शाप देतो आहेस की भविष्य सांगतो आहेस?
तुला काय वाटतं?
मला काहीच फ़रक पडत नाही.
दोन्हीचा शेवट एकच आहे त्यामुळे
तक्रारही नाही आणि भितीही नाही......
Comments