सोबती आता कशाला? तसा राहिलो नाही!!
आरती आता कशाला? तसा राहिलो नाही!!
थकलो जरा, मग मी असा थांबुन पाही,
थांबला तुम्ही कशाला? तसा राहिलो नाही!!
ऐकले तुम्ही कुणाला? जरी बोललो नाही,
भोवती येता कशाला? तसा राहिलो नाही!!
भावला मृत्यू मनाला!! तसा जगलो नाही,
गाळता अश्रु कशाला? तसा राहिलो नाही!!
थांबवा आता स्वतःला!! तसा राहिलो नाही,
गोठवा आता मनाला!! तसा राहिलो नाही!!
आरती आता कशाला? तसा राहिलो नाही!!
थकलो जरा, मग मी असा थांबुन पाही,
थांबला तुम्ही कशाला? तसा राहिलो नाही!!
ऐकले तुम्ही कुणाला? जरी बोललो नाही,
भोवती येता कशाला? तसा राहिलो नाही!!
भावला मृत्यू मनाला!! तसा जगलो नाही,
गाळता अश्रु कशाला? तसा राहिलो नाही!!
थांबवा आता स्वतःला!! तसा राहिलो नाही,
गोठवा आता मनाला!! तसा राहिलो नाही!!
Comments