Skip to main content

Posts

शोध मनाचा...

मन का?... अगाध कोडं आहे मन कधीही न उलगडणारं... असुनही प्रत्येकाकडे कधीही न सापडणारं.. मन असं मन तसं असच मानत रहायचं... पण नक्की मन कुणासारखं, असत कुठं लपलेलं... हे गुढ सतत उलगडत बसायचं... मनाचा गुंता मनानेच सोडवायचा त्याच गुंत्यात मनाला गुंतवायचं... मनाच्या शोधात मनाशीच भांडायचं मनावरच उगा रुसुन बसायच... भाडलं काय नि रुसलं काय? मन थोडीच कळलयं कुणाला.... नाही सापडणार शोधुन हे थोडीच वळलयं कुणाला... तरिही घेतोच आपण शोध मनाचा....कधीही न संपणारा....

आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

दुःख मनातलं....मनातच ठेवणं... त्यावर सुखाच....पांघरुण घालणं... असच गं सखे....आपलं झुरणं... आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....| भरारी घेताना...दिशा शोधणं... अडखळलो तरी...क्षितिज गाठणं... असच गं सखे...सारं जुळवणं... आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....| दुःखावर सखे....सुख गोंदणं... आकाशी इवल्या...पसरावं चांदणं .... हाच विचार...सतत जगणं... आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

प्रकाश..

प्रकाशाची भिती का गं सखे मनी दिशेची शाश्वती प्रकाशात...! अंधारात असे गुढतेची साथ सोड उगा यत्न गुंतण्याचा...! अंधारात साथ फ़क्त एकांताची नसे सावालीही सोबतीला...! प्रकाश किरणे ओढुन घे सखे दिशा गं प्रत्येक सापडेल...! धडपडण्याची असे सदा भिती निराधार वाटे अंधारात...! उजेडात जरी नसला साथी आधार असतो प्रकाशाचा...!

आत्मविश्वाचे थवे...

कोंडलेल्या भावनांना तु वाट नवी दे.. अंधारमय आयुष्याला आशेची पहाट नवी दे... स्वतःच्या हाताने तु नशीब घडव. हातावरच्या रेषा आता धेयाच्या दिशेने वळव... मुक्त मुक्त श्वासातुन गा तु गीत नवे ... तुझ्या स्वरातुन सदा येवो आत्मविश्वाचे थवे...

सोनेरी स्पर्श

तुझ्या मिठित येता विसरते माझे भान जसे पावसात भिजते चिंब-चिंब पान पान... तुझ्या रंगात रंगता सांग सावरावे कसे स्पर्श तुझा होता भाव आवरती कसे...? अणु-रेणु या तनाचा स्पर्शाने शहारला... तुझा सोनेरी स्पर्श रोमारोमात भिनला..

खुळं..

आठवांच्या झुल्यांवर हिंदोळा घेतो आपणही खुळे प्रेमात या होतो...! चंद्र-तार्‍यांना शब्दात उतरवतो जागुन त्यांच्यासोबत कविता रचतो...! आपल्याच विश्वात खुळ्यागत रमतो प्रेमालाही आपण खुळं बनवतो..!

बोल ना..!

तुझ्या आसवांत सये शब्द वाहु का गं देते गीत मनात दाटवुनी अशी भाव लपवते..! माझ्या शब्दातं गं तु्ला जशी ऊब मिळे प्रेमाची तशी मलाही हवी राणी उबदार कुस तुझ्या शब्दांची...! येऊ दे ना गं सये बहार तुझ्या शब्दांचा नको राहूस अबोल आता तरी बोल ना..! आता तरी बोल ना..!