(अरे मित्रा कुणी सांगेल का मला? मला हे काय होतय? तिला बघितल्या पासुन ही अशीच हालत आहे! माझी स्थिती अशी का झाल्येय? फक्त ती दिसते आणि.......)
दिसतेस तु, मन बावरे
होते तेंव्हा का बरे?
भावना मनातुनी उफळती
परी त्या का शब्दात ना उतरती?
बद्ध झाली मय मती
डोक्यात का काहीच ना शिरती?
मन वेडे, फिरते अवतिभवती
तू नसता का उगाच ते भिरभिरती?
डोळे तुलाच ग शोधिती
तुजसाठी का जागतो मी रती?
माझे मलाच ना आकळती
ऐसी का व्हावी मज स्थिती?
(ती बघ ती येत्येय .......जा जा सांग जा! अरे जा सांग तुला काय काय होतय ! अरे गधड्या वेळ जाईल
तोंड उघड आता. अरे वेड्या तुला काय झालं माहीत आहे का?.... )
मित्र सारखे मजला पिडती
हे तर प्रेम असे का म्हणती?
तु येता मला ते चिडवती
वेळ जाईल,आता तरी तोंड उघड की !
(अच्छा हे प्रेम आहे तर! सांगु म्हणताय? पण फज झालं तर? बर...बर सांगतो! पण काय बोलु?.....भीती वाटते रे ! )
सांग तिला,वाढवुया आपण नाती
देशील का हात तुझा ग हाती?
पर सांगु कसे, वाटते मजला भिती
तोची हात जर पडला गालावरती?
(अता सांगतोस का? जा ना.....तु Tension घेवु नको आम्ही आहोत पाठी. जा सांग जा ती बघ आली ! जा.. जा रे!)
एके दिवशी बळेच ते मला फुसवती
जा सांग म्हणुनी तिजपाशी धाडती
नजरेला नजर माझी भिडती
बोलताना ओठ माझे कापती
क्षणैक पाच बोटे गालावर पडती
मान खाली, पावले मागे वळती
खांद्यावर हात ठेवुनी थांबवे ती,
म्हणे, "मुर्खा, वाट पहीली रे मी किती?"
मारे मिठी, आनंद झाला मज अती
बघता ते मित्र पाठुनी हासती.
दिसतेस तु, मन बावरे
होते तेंव्हा का बरे?
भावना मनातुनी उफळती
परी त्या का शब्दात ना उतरती?
बद्ध झाली मय मती
डोक्यात का काहीच ना शिरती?
मन वेडे, फिरते अवतिभवती
तू नसता का उगाच ते भिरभिरती?
डोळे तुलाच ग शोधिती
तुजसाठी का जागतो मी रती?
माझे मलाच ना आकळती
ऐसी का व्हावी मज स्थिती?
(ती बघ ती येत्येय .......जा जा सांग जा! अरे जा सांग तुला काय काय होतय ! अरे गधड्या वेळ जाईल
तोंड उघड आता. अरे वेड्या तुला काय झालं माहीत आहे का?.... )
मित्र सारखे मजला पिडती
हे तर प्रेम असे का म्हणती?
तु येता मला ते चिडवती
वेळ जाईल,आता तरी तोंड उघड की !
(अच्छा हे प्रेम आहे तर! सांगु म्हणताय? पण फज झालं तर? बर...बर सांगतो! पण काय बोलु?.....भीती वाटते रे ! )
सांग तिला,वाढवुया आपण नाती
देशील का हात तुझा ग हाती?
पर सांगु कसे, वाटते मजला भिती
तोची हात जर पडला गालावरती?
(अता सांगतोस का? जा ना.....तु Tension घेवु नको आम्ही आहोत पाठी. जा सांग जा ती बघ आली ! जा.. जा रे!)
एके दिवशी बळेच ते मला फुसवती
जा सांग म्हणुनी तिजपाशी धाडती
नजरेला नजर माझी भिडती
बोलताना ओठ माझे कापती
क्षणैक पाच बोटे गालावर पडती
मान खाली, पावले मागे वळती
खांद्यावर हात ठेवुनी थांबवे ती,
म्हणे, "मुर्खा, वाट पहीली रे मी किती?"
मारे मिठी, आनंद झाला मज अती
बघता ते मित्र पाठुनी हासती.
Comments