प्रस्तुत कवितेत एका विखुरलेल्य घराचे वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय.
आजी,आजोबा,काका काकु आणि आम्ही सगळे कसे आनंदात रहात होतो...पण काय झाले काही कळालेच
नाही..गोकुळात लंका नांदायला लागली...आणि एक दिवस तो उजाडलाच बाहेर पडण्याचा...वेगळे होण्याचा.
सादर करतोय..
या गोजीरवाण्या घरात !!
एक गोजीरवाण घर होतं,
आपलेपणातच सारं काही होत.
घरात कसा माणसांचा रिघ असायचा,
आज तो नावाला सुद्धा नसायचा.
घराला घर म्हणायला काही हल्ली राहीलच नाही,
चार भिंती शिवाय काही उरलच नाही.
चार माणसं चार कोपऱ्यात,
प्रत्येक जण आपल्याच तोऱ्यात.
माणसां प्रमाणेच घराचे पोकळ वासे,
घेत बसतात तेही मग उसासे.
एक म्हणायच म्हणुन नावाला कुटुंब,
बघितलकी चेहरे होतात अरुंद.
पहाताना होत असलेल घर वेगळे,
घराला जोडणारे खिळेही झालेत खिळखिळे.
गेले.. ते सोनीयाचे दिवस गेले,
देवाने ते आमच्या पासुन हीरावले.
आईचा ओरड, काकुचा लाडु,
आता कुणाकडे जाउन मागु.
बाबांचा मार, धोपट पाठ,
काकांच बक्षिस, थोपट पाठ.
आजीच्या गोष्टीतला गोड मुका,
मुकतोय त्याला, तोही झालाय मुका.
घराला असायचा आजोबांचा भक्कम आधार,
आज घरातच झालेत स्वःता ते निराधार.
आजोबा म्हणतायत,
आपलं सुख कोणाला बघवेना,
लांबच काही मला दिसेना.
घराची स्थिती घरालाच पहावेना,
घर म्हणतय मलाच अता रहावेना.
आजी,आजोबा,काका काकु आणि आम्ही सगळे कसे आनंदात रहात होतो...पण काय झाले काही कळालेच
नाही..गोकुळात लंका नांदायला लागली...आणि एक दिवस तो उजाडलाच बाहेर पडण्याचा...वेगळे होण्याचा.
सादर करतोय..
या गोजीरवाण्या घरात !!
एक गोजीरवाण घर होतं,
आपलेपणातच सारं काही होत.
घरात कसा माणसांचा रिघ असायचा,
आज तो नावाला सुद्धा नसायचा.
घराला घर म्हणायला काही हल्ली राहीलच नाही,
चार भिंती शिवाय काही उरलच नाही.
चार माणसं चार कोपऱ्यात,
प्रत्येक जण आपल्याच तोऱ्यात.
माणसां प्रमाणेच घराचे पोकळ वासे,
घेत बसतात तेही मग उसासे.
एक म्हणायच म्हणुन नावाला कुटुंब,
बघितलकी चेहरे होतात अरुंद.
पहाताना होत असलेल घर वेगळे,
घराला जोडणारे खिळेही झालेत खिळखिळे.
गेले.. ते सोनीयाचे दिवस गेले,
देवाने ते आमच्या पासुन हीरावले.
आईचा ओरड, काकुचा लाडु,
आता कुणाकडे जाउन मागु.
बाबांचा मार, धोपट पाठ,
काकांच बक्षिस, थोपट पाठ.
आजीच्या गोष्टीतला गोड मुका,
मुकतोय त्याला, तोही झालाय मुका.
घराला असायचा आजोबांचा भक्कम आधार,
आज घरातच झालेत स्वःता ते निराधार.
आजोबा म्हणतायत,
आपलं सुख कोणाला बघवेना,
लांबच काही मला दिसेना.
घराची स्थिती घरालाच पहावेना,
घर म्हणतय मलाच अता रहावेना.
Comments