सध्या ’फ़्रेशर’ हे गोंडस नाव धारण करून ट्रेनिंग नावाच्या अतिभयंकर प्रकारातून जात आहोत. त्या ’ट्रेनिंग’ ला ही कविता(?) अर्पण. :-)
काही चेहरे कंटाळलेले काही आधीच्याच गप्पांवर रेंगाळलेले
दिव्यांच्या चकचकाटातही अस्मादिक पेंगुळलेले
ट्रेनरचा संथ आवाज , पडद्यावरची गुळगुळीत अक्षरे
शांततेचा भंग करीत एखादीचा मोबाईल थरथरे
थंडगार एसीखाली झोप अनावर होत होती
च्यामारी पोस्टलंच सेशनआधी कॉफ़ी प्यायला हवी होती
Thank you ची स्लाईड दिसता मात्र क्षणार्धात नूर बदलला
वठलेल्या झाडावर जणू वसंतातला गुलमोहोर फ़ुलला
की प्रकाशवेगाने सर्वांनी प्रतिक्रीयापत्रिका भरली
अन अटेंडन्सशीट क्षणार्धात रूमभर फ़िरली
सुतकी होते ते चेहरे हसरे अन उल्हासित झाले
ट्रेनरसमोर रमत गमत रूममधून बाहेर पडले
झाली रूम रिकामी , उरले चिंतातूर जंतू काही
ही कशी झाली किमया ट्रेनरलाही कळले नाही

Comments