मोरपीस बाळाच्या मुठीतलं
आईच्या उबदार कुशीतलं
मोरपीस ’तिच्या’ नोटबुकातलं
’त्याच्या’ पहिल्या भेटीतलं
सीमेवरच्या जवानाच्या पेटीतलं
त्याच्या घरी घालवलेल्या सुटीतलं
मोरपीस गुलजारच्या मनातलं
आणि लताच्या सतरंगी सुरातलं
मोरपीस माझ्या टेबलाच्या खणातलं
तिच्यासोबतच्या मंतरलेल्या क्षणातलं
मोरपीस मोराच्या पिसार~यातलं
लांडोरीच्या व्याकूळ डोळ्यातलं
पारध्याच्या पोटातल्या आगीतलं
आणि डार्विनच्या थडग्यावरच्या मातीतलं.
आईच्या उबदार कुशीतलं
मोरपीस ’तिच्या’ नोटबुकातलं
’त्याच्या’ पहिल्या भेटीतलं
सीमेवरच्या जवानाच्या पेटीतलं
त्याच्या घरी घालवलेल्या सुटीतलं
मोरपीस गुलजारच्या मनातलं
आणि लताच्या सतरंगी सुरातलं
मोरपीस माझ्या टेबलाच्या खणातलं
तिच्यासोबतच्या मंतरलेल्या क्षणातलं
मोरपीस मोराच्या पिसार~यातलं
लांडोरीच्या व्याकूळ डोळ्यातलं
पारध्याच्या पोटातल्या आगीतलं
आणि डार्विनच्या थडग्यावरच्या मातीतलं.
Comments