रात्रीची दहाची वेळ. नेमके दिवे गेले. खूप उकडत होतं म्हणून टेरेसवर पोचलो. एका आज्जी आजोबांचा अपवाद वगळता टेरेस बिलकूल रिकामं. रूममेटला वर चलण्याचा आग्रह करूनही तो आलाच नाही. त्यामुळे मी एकटाच.
तसे दुकटे देखील असतेच कोण? सगळेच असतात आपले आपले
आपले आपले म्हणले तरी आपण कुठे असतो आपले?
हं. ’आयुष्यावर बोलू काही’ बघितल्यापासून संदिप खरे अगदी डोक्यात फ़िट्ट बसलाय. कुठेही काहीही प्रसंग असला की याची आपली कविता तयार. छे! इतकं काय ते प्रभावित व्हायचं कुणाच्या तरी कवितांनी! स्वत:ला जमायला हवं आता काहीतरी.
अशा वेळी वाटते काहीतरी लिहावे अशा वेळी वाटते काहीतरी लिहावे
कवितेची आवड वेगळी आणि कविता करणे वेगळे
पुरे. पुरे. दुस-या कुणाची कविता आपल्या ब्लॉगवर टाकू नये. त्याने आपल्या ब्लॉगची किंमत कमी होते.
कुठे होतो बरं मी? हा. तर टेरेसवर बसलेले आजी आजोबा थोड्या वेळात कंटाळून निघून गेले. माझ्या फ़े-या चालूच.
टेरेसच्या समोर एका बिल्डिंगच्या खिडक्या. खिडकीतून दिसणारा जिना. फ़िरता फ़िरता सहज लक्ष गेलं अन दिसली जिन्यात बसलेली एक मुलगी. माझ्या अगदी समोर. मध्ये दहा फ़ुटांचं अंतर. नजर खिळणं की काय ते झालं. इतका अंधार की चेहरा दिसत नव्हता. पण तिने माझ्या नजरेला नजर भिडवली आहे हे त्या अंधारातही जाणवलं.
अचानक उजळला तिचा चेहरा पेटत्या स्फ़ुल्लिंगाच्या उजेडात. तो प्रकाश तिच्या चेह-यावर स्थिरावतो आहे इतक्यातच धुराच्या लोटाच्या पडद्याआड गेली ती. अस्पष्ट , अंधुक , अनोळखी. विस्मित झालेला मी.
दिवे लागले. मी चमकलो तिच्या हातातील सिगारेट पाहून.
धन्यवाद तिचेच मानावेसे वाटत होते राहून राहून.
खामोश होती रातच ती अन रोशन झाला तिचा चेहरा
गाण्याचा या अर्थ वाटतो आता आणखीन गहिरा गहिरा
हे जर्रा संदिप खरे टाईप वाटत नाहीये का? हं ........नो कमेंटस.
बेदरकारपणे सिगारेट ओढत बसली होती ती. जिना उतरणा-या तिच्या सहका-यांशी बोलत होती. मला कुतूहल वाटलं. ही अशी, इथे , या वेळी काय करतेय? सिगारेट फ़ुंकणं यामागे फ़क्त नियम धुडकावणं आहे की प्रश्नांसमोर हतबल झाल्याने पत्करलेली शरणागती?
अचानक ती उठली. उरलेलं सिगारेटचं थोटूक चुरगाळून फ़ेकून देत पाय-या उतरत शेजारच्या हॉलमध्ये शिरली. टेबलावर पर्स ठेवली. खुर्ची पुढे ओढून बसली. हेडफ़ोन कानावर अडकवत काहीतरी बोलली. कळलं नाही. पण पुढचे शब्द मात्र काचेची भिंत पार करत माझ्यापर्यत येउन पोचले होते. ’मे आय हेल्प यू?’
आणखी एक रात्र तिची कॉल सेंटर मधली. कदाचित फ़क्त दोन सिगारेटच्या मधली वेळ बनलेली तिची जिंदगानी. आणि पुन्हा एकदा माझ्या मदतीला धावणारा संदिप खरे.
आता आठवताहेत ते फ़क्त काळेभोर डोळे
बाकी सारे आकार उकार होकार नकार
मागे पडत चाललेल्या स्टेशनासारखे
मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत
पुसत जावेत ढगांचे आकार आणि उरावं एकसंध आभाळ
तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं
भरून आलेली गाफ़ील गाणी
काळेसावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे

Comments