आज तळ्याकाठी
भेटली हंसीनी
तरंगत होती
शुभ्र पंख फैलावूनी
वाटले मज तेव्हा
व्हावे तीचा हंसराज,
घ्यावे तीला जवळ
सांगावे मनातले आज..
तेवढ्यात ती
जरा पुढे सरकली,
जलतरंगाची छटा
अलगद उमटवली
हाय! पाहून ते सारं
काळीज माझं धडधडलं,
वाटलं क्षणात हे सारं
स्वप्नात तर नाही ना घडलं..
केला जलविहार तीने
अन थेंबाचे मोती झटकले,
उडले काही तुषार त्यातले
अन माझ्या ओठी चिकटले..
धन्य झालो मी ,
तिच्या आभासी स्पर्शाने,
गेली करूनी जादू,
तिच्या मखमल सौंदर्याने..
Comments