असं अजुन कोणी भेटलंच नाही..........
थोडयाशा थोडयाशा कारणानं माझ्यावर नेहमी रुसाणार
माझ्या डोळ्यांतील अश्रु स्वत:च्या हाताने पुसाणार
असं अजुन कोणी भेटलंच नाही....
मनातले प्रत्येक गुपित अगदी निरागसपणे मांडणार
सोन्याचांदीचा मोह सोडुन वेणीतल्या फुलांसाठी भांडणार...
असं अजुन कोणी भेटलंच नाही.....
त्याच्या एका चोरट्या नजरेसाठी दिवसभर झुरणार
मरुनसुद्धा त्याच्यासाठीच थोडसं तरी उराणार
असं अजुन कोणी भेटलंच नाही.....
होय असं अजुन कोणीच भेटलंच नाही
मनातलं वादळ पेटलंच नाही आणि
म्हणुनच प्रेम म्हणजे काय
हेच मल अजुन कळलंच नाही..................
Comments